दिल्लीकरांना 26 जुलैचा अनुभव, तुफान पावसाने रस्त्यांवर गुडघाभर पाणी
एबीपी माझा वेब टीम | 26 Jul 2018 01:23 PM (IST)
दिल्लीत आज सकाळपासून पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळेच सर्वत्र पाणी भरलं. मुंबईत 26 जुलै 2005 रोजी जसा महापूर होता, त्याची आठवण आज 26 जुलै 2018 रोजी दिल्लीकरांना आली असेल.
नवी दिल्ली: मुसळधार पावसाने दिल्लीचे रस्ते पाण्यात गेले आहेत. रस्त्यांना अक्षरश: स्वीमिंग पूलचं स्वरुप आलं. भल्या मोठ्या रस्त्यांवर, हायवेवर चक्क गुडघाभर तर कुठे कमरेपर्यंत पाणी भरलं. दिल्लीत आज सकाळपासून पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळेच सर्वत्र पाणी भरलं. मुंबईत 26 जुलै 2005 रोजी जसा महापूर होता, त्याची आठवण आज 26 जुलै 2018 रोजी दिल्लीकरांना आली असेल. रस्त्यावर अनेक किलोमीटर अंतरावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. तिकडे गाझियाबादमध्ये नुकताच तयार केलेल्या एलिवेटेड रोडच्या उड्डाणपुलावर पाणी भरलं आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे. गुडघाभर पाण्यातून वाट काढत कार्यालयं गाठणं मोठं जिकीरीचं काम आहे. तुफान पावसामुळे गाझियाबादमधील इंदिरापूरममध्ये रस्त्यावर मोठा खड्डा पडला. रस्ता खचून खड्डा पडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.