नवी दिल्ली : नवी दिल्लीसह आसपासच्या परीसरात मोठं धुळीचं वादळ सुरु आहे. त्यामुळे ऐन दुपारी दिल्लीत अंधाराचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. दिल्लीत या धुळीच्या वादळामुळे अनेक झाडं उन्मळून पडली आहेत.
गेल्या काही तासांपासून दिल्लीसह परीसरात धुळीच्या वादळाने थैमान माजवलं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. वादळामुळे विमानतळावरही अलर्ट जारी करण्यात आला असून विमानांची उड्डाणंही थांबवण्यात आली आहेत.
दिल्लीत या वादळामुळे वाहतूकही मंदावली आहे. रविवारी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दिल्लीकरांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे वादळ असंच सुरु राहिलं तर आणखी भीषण परिस्थिती उद्भवू शकते.
दिल्लीत धुळीच्या वादळासह मुसळधार पावसाला सुरुवात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 May 2018 06:11 PM (IST)
नवी दिल्लीसह आसपासच्या परीसरात मोठं धुळीचं वादळ सुरु आहे. त्यामुळे ऐन दुपारी दिल्लीत अंधाराचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. दिल्लीत या धुळीच्या वादळामुळे अनेक झाडं उन्मळून पडली आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -