हैदराबाद : तेलंगणात उष्माघाताने आतापर्यंत तब्बल 66 जणांचा बळी घेतला आहे. सर्वाधिक बळी हे मेहबूबनगर जिल्ह्यात नोंदवले गेले आहेत.

 

गेल्या काही महिन्यात अनेक राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. त्याचा सर्वाधिक फटका तेलंगणा राज्याला बसताना दिसतोय. तेलंगाणाचं तापमान 40 अंश सेल्सियसच्या पुढे आहे. मेहबूबनगर व्यतिरीक्त मेडक, करीमनगर, खमान जिल्ह्यात उष्माघाताचे बळी गेले आहेत.

 

मेहबूबनगर जिल्ह्यात 28, मेडकमध्ये 11, निजामाबाद 7, खमान आणि करीमनगरमध्ये प्रत्येकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

सलग तीन वर्षांपासून तेलंगणात दुष्काळ पडत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. गेल्या वर्षी तेलंगणात तब्बल 1000 लोकांचा उष्माघाताने बळी गेला होता. मात्र यंदाचं तापमान पाहता यावर्षीही उष्माघाताचे बळी वाढण्याची भीती आहे.

 

महाबळेश्वरही तापलं

एकीकडे तेलंगणात तापमान वाढलेलं असताना इकडे महाराष्ट्रातही उष्णतेच्या झळा वाहत आहेत. मिनी काश्मिर म्हणून ओळखलं जाणाऱ्या महाबळेश्वरलाही या तापमानाचा फटका बसलाय.