Heatwave Alert News: देशातील वातावरणात बदल (Climate change) होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कुठं उन्हाचा तडाखा (Heat) पाहायला मिळत आहे, तर कुठं अवकाळी पावसाचा (Rain) जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (IMD) देशातील काही भागात  20 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा (Heatwave Alert)  दिला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. 


तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसची वाढ


भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस तापमानात हळूहळू 2 ते 4 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 18 ते 20 एप्रिलदरम्यान, ओडिशातील काही भागात तापमान 45 अंशावर जाण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तसेच सध्या परिस्थिती पाहता, तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यामुळं ओडिसा राज्यातील सर्व शाळा 18 ते 20 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.  


या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा


भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार ओडिसा, पश्चिम बंगाल, कोकण, सौराष्ट्र आणि कच्छ, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, ओडिशा या राज्यातील काही भागात येत्या पाच दिवसांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळं या काळात नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


गुजरातमध्येही मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ 


दरम्यान, गुजरातमध्ये देखील मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होताना दिसत आहे. पुढील तीन दिवसात गुजरातमध्ये तापमान 41 ते 43 अंश सेल्सिअसवर जाण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. त्यामुळं या काळात नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. दुपारच्या उन्हाच्या वेळेस नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा


महाराष्ट्रात देखील दिवसेंदिवस हवामानात बदल होत आहे. कुठं उन्हाचा चटका जानवत आहे, तर कुठं अवकाळी पावसाचा जोर असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, 20 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान अभ्यासकांनी दिली आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबदारी घेण्याच आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 20 एप्रिल पर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


सावधान! पुढील तीन दिवस राज्यातील 'या' भागात जोरदार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज