Weather Report:  देशात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना उष्णतेचा प्रकोप सहन करावा लागत आहे. अशातच आता लोकांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे की, देशातील सर्व भागात उष्णतेचा प्रकोप कमी झाला आहे. दिल्ली, पंजाब, राजस्थान आणि हरियाणामधील कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने घट झाली आहे. पुढील पाच दिवस उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारताच्या कोणत्याही भागात तीव्र उष्णतेची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.


महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये पुन्हा एकदा पारा वाढणार 


हवामान खात्याने सांगितले की, उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य भारतातील बहुतांश भागात पुढील दोन ते तीन दिवस कमाल तापमानात कोणताही विशेष बदल होणार नाही. यानंतर पारा दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढू शकतो. बुधवारपासून महाराष्ट्राच्या काही भागात आणि शुक्रवारपासून राजस्थानच्या काही भागात पुन्हा उष्णतेचा प्रकोप वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.


या राज्यांमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पाऊस पडण्याची शक्यता


वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे, पुढील दोन दिवस पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये काही प्रमाणात पाऊस, धुळीचे वादळ आणि ताशी 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. देशभरात अनेक ठिकाणी एप्रिलमधील तापमान आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचले आहे. तापमान 46 ते 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.


दिल्लीत एप्रिलचे सर्वाधिक तापमान 43.5 अंश सेल्सिअस 


दिल्लीत गुरुवार आणि शुक्रवारी 12 वर्षांतील एप्रिलमधील सर्वोच्च तापमान 43.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिल्लीतील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वेदर स्टेशनवर शनिवारी कमाल तापमान 47.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.


महत्वाच्या बातम्या