सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय चिकित्सा आयोगाच्या (एनएमसी) विधेयकामधील संशोधनानुसार नॅशनल एक्जिट टेस्टमधील (एनएक्सटी) गुणांच्या आधारावर पदव्युत्तर कोर्सेसमध्ये प्रवेश घेता येईल. त्यामुळे एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पदव्युत्तर कोर्सेसमध्ये (उदा. एमडी, एमएस) प्रवेश घेता येईल. तसेच
विद्यार्थ्यांना प्रॅक्टिसकरिता परवाना मिळवण्यासाठी वेगळी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. परंतु भारतीय आयुर्विज्ञान संस्थानमध्ये (एम्स) प्रवेश घेण्यासाठी वेगळी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यासोबतच डीएम/एमसीएच मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नीट-सुपर स्पेशालिटीची (neet superspeciality) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.