नवी दिल्ली : तुमच्या खिशात असलेल्या नोटा या तुम्हाला गंभीर आजारी पाडण्यासाठी कारणीभूत आहेत, असा संशय निर्माण झाला आहे. या नोटांच्या संपर्कामुळे टीबी आणि अल्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात, असा दावा दिल्लीतल्या एका व्यापारी संघटनेने केला आहे.
कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने यासंदर्भात अर्थमंत्री अरुण जेटलींना पत्र दिले असून, उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आलीय.
चलनी नोटा अनेकजण हाताळत असतात, अशावेळी त्यावर अनेक प्रकारचे विषाणू चिकटतात. व्यापारी समाज आणि बँकेतले कर्मचारी हे या नोटांच्या संपर्कात सर्वाधिक येतात. त्यामुळे त्यांना या नोटांच्या संसर्गाचा धोका निर्माण होऊन माणसं आजारी पडण्याची शक्यता असते. या प्रकरणी अर्थमंत्रालयाने लक्ष घालून, यावर उपाय शोधण्याची मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे.
कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने या दाव्याची आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना दखल घेण्याची विनंती केली आहे. व्यापारी संघटनांनी वेगवेगळ्या अहवालांच्या निष्कर्षांचा संदर्भ देत, नोटांवर बॅक्टेरिया आढळल्याचा दावा केला आहे. टीबी, अल्सर यांसारखे आजारही नोटांमुळे होऊ शकतात, असा दावाही या व्यापारी संघटनेनी केला आहे.
कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी याबाबत सांगितले की, “खरंतर दरवर्षी अशाप्रकारचा अहवाल विज्ञान मासिकात प्रकाशित होत असतो. मात्र आरोग्यासंदर्भात कुणीही गंभीरपणे दखल घेत नाही. त्यात व्यापारी वर्ग छापील नोटा जास्तीत जास्त हाताळत असतात. त्यामुळे या अहवालातील माहिती जर खरी ठरली, तर व्यापाऱ्यांनाच ते घातक आहे.”
नोटांमुळे टीबी, अल्सरसारखे आजार, व्यापारी संघटनेचा दावा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Sep 2018 10:50 PM (IST)
कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने यासंदर्भात अर्थमंत्री अरुण जेटलींना पत्र देण्यात आले असून, उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आलीय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -