HDFC बँकेत बेकायदेशीरपणे नोटांची बदली, चार कर्मचारी निलंबित
एबीपी माझा वेब टीम | 05 Dec 2016 03:03 PM (IST)
NEXT PREV
चंदीगड : चंदीगडमध्ये एचडीएफसी बँकेच्या ब्रांच मॅनेजरसह चार कर्मचाऱ्यांना जुन्या नोटांची बेकायदेशीरपणे बदली करुन दिल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. एचडीएफसी बँकेकडून काल ही माहिती देण्यात आली. चंदीगडमधील एका एचडीएफसी बँकेच्या शाखेत संशयितरित्या नोटा बदली झाली असल्याचं निदर्शनास आलं. चौकशीनंतर यामध्ये चार जण दोषी आढळल्याने त्यांचं निलंबन करण्यात आलं, अशी माहिती एचडीएफसी बँकेनी दिली आहे. दरम्यान बँकांमध्ये गैरव्यवहार होऊ नये, यासाठी रिझर्व्ह बँकेने नुकतेच कडक आदेश दिले आहेत. नोटाबदली संदर्भातील सर्व तपशील मागेल तेव्हा रिझर्व्ह बँकेला पुरवावा लागेल, असं रिझर्व्ह बँकेने सांगितलं आहे.