500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर बँका आणि एटीएमबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. परंतु नव्या नोटाच फार कमी असल्याने अनेकांना रिकाम्या हाती परतावं लागतं. त्यामुळेच आता एचडीएफसीने स्वाईप मशिनच्या धर्तीवर ग्राहकांना रिटेल दुकानांमधून पैसे काढण्याची सुविधा दिली आहे.
एचडीएफसी बँकेने परिपत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे. महानगरातील 50 पेक्षा जास्त मोठ्या दुकानांमध्ये डेबिट कार्ड स्वाईप करुन ग्राहक 2000 हजार रुपये काढू शकतात, असं एचडीएफसी बँकेतर्फे सांगण्यात आलं आहे.
दुकानं, मॉल्समधल्या स्वाईप मशिन्समधूनही दोन हजार काढा
ही सुविधा फक्त एचडीएफसी बँकेच्याच नाही तर इतर बँकांच्या ग्राहकांना उपलब्ध असेल.
एचडीएफसी बँकेने फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन या दुकान मालकांच्या संघटनेसोबत टायअप केलं आहे.
रुपम, बेन्झर, अमरसन्स, कलानिकेतन, प्रेमसन्स, एशियाटिक, लिबाज, सिझन, मेट्रो, कॅटवॉक आणि मोची या दुकानातून ग्राहक डेबिट कार्ड स्वाईप करुन पैसे काढू शकतात.
परंतु ग्राहक केवळ 2000 रुपयेच काढू शकतील, असंही एचडीएफसी बँकेने स्पष्ट केलं आहे.