हाथरस (उत्तर प्रदेश) : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. राहुल गांधी यांना कलम 188 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पायी चालत निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखलं आणि राहुल गांधी यांना अटक केली.
तुम्ही मला का आणि कोणत्या कलमांतर्गत अटक करत आहात, असा प्रश्न राहुल गांधी यांनी अटकेपूर्वी पोलिसांना केला होता. परंतु कलम 144 लागू असल्याने आम्ही तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही, असं उत्तर पोलिसांनी त्यांना दिलं. यानंतर काही वेळाने राहुल गांधी यांना पोलिसांनी अटक केली.
राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्की
हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी दिल्लीवरुन हाथरसला रवाना झाले. मात्र त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. त्यानंतर राहुल आणि प्रियंका यमुना एक्स्प्रेस वेवरुन हाथरसला पायी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र एका ठिकाणी पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी " ये देखो आज का हिंदुस्तान," असं राहुल गांधी एबीपी माझाच्या प्रतिनिधीशी बोलत होते. त्याचवेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. त्यानंतर राहुल गांधी रस्त्याच्या कडेला पडले. यानंतर उठून ते पुन्हा चालू लागले.
संबंधित बातम्या
Hathras Gang Rape | राहुल गांधी यांना यूपी पोलिसांकडून अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Oct 2020 03:20 PM (IST)
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. हाथरस बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी राहुल गांधी यमुना एक्स्प्रेस वेवरुन पायी निघाले होते. यावेळी राहुल गांधींना पोलिसांना धक्काबुक्की केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -