नवी दिल्ली : रिओ दी जानरो इथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी अभिनेता सलमान खानला भारतीय पथकाचा सदिच्छादूत बनवल्याने हरियाणाचे क्रीडामंत्री अनिल विज यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच सलमान नाही तर योगेश्वर दत्त खरा हिरो असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

योगेश्वर दत्तने नाराजी व्यक्त केली होती. योगेश्वरने 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदकाची कमाई केली होती.


रिओ ऑलिम्पिकचा सदिच्छादूत सलमानवर योगेश्वर दत्तचे ताशेरे


 

रिओ ऑलिम्पिक गुडविल अॅम्बेसेडर म्हणून कुस्तीपटू योगेश्वर दत्तच योग्य असल्याचं मत अनिल विज यांनी व्यक्त केलं आहे.

 

"योगेश्वर हा खरा हिरो आहे तर सलमान फिल्मी हिरो. खरा हिरो देशासाठी पदक घेऊन येतो, चित्रपटाचा हिरो नाही", असं ट्वीट अनिल विज यांनी केलं आहे.

https://twitter.com/anilvijmantri/status/724458508587044865


ऑलिम्पिक अॅम्बेसेडर वाद : सलमानच्या बचावासाठी सलीम खान मैदानात


 

"रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी चांगल्या खेळाडूची निवड करायला हवी होती. ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्तने कुस्तीमध्ये देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. तसंच चित्रपटातील हिरोंना सांस्कृतिक कार्यक्रमात प्राथमिकता द्यावी, खेळामध्ये नाही, असंही विज म्हणाले.

 

दरम्यान, रियो ऑलिम्पिक 2016 साठी भारतीय पथकाचा सदिच्छादूत म्हणून सलमान खानची नेमणूक करणं योग्य नाही, असं म्हणत योगेश्वर दत्तने नाराजी व्यक्त केली होती. योगेश्वरने 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदकाची कमाई केली होती.