Suspected Terrorist Arrested : दिल्ली, महाराष्ट्रात मोठा घातपात करण्याचा कट हरयाणातील करनाल पोलिसांनी उधळला आहे. हरयाणा पोलिसांनी तीन ते चार संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. या संशयित दहशतवाद्यांकडून पिस्तूलाचे 31 कारतूस आणि 3 आयईडी जप्त करण्यात आले आहे. सध्या या संशयित दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरू असून हरयाणा पोलिसांसह इतर तपास यंत्रणांनाही चौकशी करत असल्याचे वृत्त आहे. 


मिळालेल्या प्राथमिक वृत्तानुसार, हे दहशतवादी पंजाबहून दिल्ली येथे जात होते. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या संशयितांना मधुबन जवळून अटक केली आहे. हे संशयित दहशतवादी  एका एसयूव्ही कारमधून प्रवास करत होते. कारमध्ये संशयास्पद पदार्थ आढळल्याने बॉम्ब नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. 






पोलीस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले तीन संशयित फिरोजपूर येथील असून एकजण लुधियाना येथील आहे. हे चारही आरोपी दिल्ली मार्गे महाराष्ट्रातील नांदेड येथे जात होते. या संशियत आरोपींचा पाकिस्तानशी काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे. 


बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेसोबत संबंध?


गुप्तचर संस्था आयबीला मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांसह ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. अटकेत असलेल्या संशयित दहशतवाद्यांचा बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याचा संशय आहे. 


ड्रोनद्वारे शस्त्रांचा पुरवठा


आतापर्यंत करण्यात आलेल्या चौकशीनुसार, या संशयित दहशतवाद्यांना ड्रोनद्वारे शस्त्र पुरवठा करण्यात आला. पाकिस्तानमधील दहशतवादी हरविंदर सिंह रिंदा याच्यासोबत या दहशतवाद्यांचे संबंध असल्याचे म्हटले जात आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Pakistan Nuclear Weapons: पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत का? दिल्ली, मुंबईसह हे शहर पाकच्या रडारवर