चंदीगड : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांनी वयाच्या तब्बल 82 व्या वर्षी बारावीची परीक्षा पास केली आहे. विशेष म्हणजे ओमप्रकाश चौटाला 'ए' ग्रेडसह पास झाले असून आता त्यांनी पदवीची तयारी सुरु केली आहे.
ओमप्रकाश चौटाला यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगमधून बारावीची परीक्षा दिली.
जेबीटी शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ओमप्रकाश चौटाला आणि त्यांचे पुत्र अजय यांना 16 जानेवारी 2013 रोजी 10 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. सध्या ते दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आहे. जेलमध्येच त्यांनी अभ्यास केला.
हरियाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली होती. हा नियम विधानसभा निवडणुकीतही लागू होऊ शकतो. हे पाहता निवडणूक लढवण्यासाठी चौटाला जेलमध्येच अभ्यास करत आहेत.