Continues below advertisement


Rahul Gandhi H Files PC : हरियाणातील निवडणूक 25 लाख बोगस मतदारांच्या माध्यमातून चोरण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. 2 कोटी मतदारांपैकी 25 लाख मतदार हे बोगस आहेत, हरियाणातील प्रत्येक आठवा मतदार हा खोटा असल्याचा दावा राहुल गांधींनी केला. त्यावर आता हरियाणा निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. विधानसभा निवडणूक ही पारदर्शक पद्धतीने पार पडली असून त्यावेळी काँग्रेसने कोणताही आक्षेप घेतला नव्हता किंवा तशी तक्रार दाखल केली नव्हती असं आयोगाने म्हटलं.


राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाने उत्तर दिलं असून 15 मुद्द्यांच्या आधारे निवडणूक कशी पारदर्शक पद्धतीने पार पडली याचे स्पष्टीकरण दिलं.




निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले मुद्दे खालीलप्रमाणे,


1. निवडणुकीसाठी 02 ऑगस्ट 2024 रोजी मसुदा मतदार यादी (Draft Voter List) प्रकाशित करण्यात आली आणि सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसोबत शेअर करण्यात आली.


2. SSR दरम्यान प्राप्त झालेल्या दावा आणि आक्षेपांची एकूण संख्या 4,16,408 होती.


3. BLO ची एकूण संख्या: 20,629


4. अंतिम मतदार यादी 27 ऑगस्ट 2024 रोजी प्रकाशित करण्यात आली आणि सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसोबत शेअर करण्यात आली.


5. जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे (District Magistrate) ERO विरुद्ध दाखल केलेल्या अपीलांची संख्या: 0


6. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशांविरुद्ध CEO कडे दाखल केलेल्या दुसऱ्या अपीलांची संख्या: 0


7. उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत मतदार यादी अंतिम करण्यात आली आणि 16 सप्टेंबर 2024 रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसोबत शेअर करण्यात आली.


8. मतदान केंद्रांची (Polling Booths) एकूण संख्या: 20,632


9. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची (Candidates) एकूण संख्या: 1,031


10. सर्व उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतदान प्रतिनिधींची (Polling Agents) एकूण संख्या: 86,790


11. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी तपासणीदरम्यान उमेदवारांनी नोंदवलेल्या आक्षेपांची संख्या: 0


12. मतमोजणीसाठी सर्व उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींची (Counting Agents) संख्या: 10,180


13. मतमोजणीदरम्यान Returning Officer ला प्राप्त झालेल्या तक्रारींची संख्या: 5


14. निकाल 8 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित करण्यात आला.


15. निवडणुकीला आव्हान देण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकांची (Election Petitions) संख्या: 23


निवडणूक झाल्यानंतर विरोधी पक्षाने कोणतीही तक्रार किंवा अपील दाखल केली नाही असा दावा निवडणूक आयोगाने केला. तसेच आयोगाने सगळी प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने पार पाडली आणि आवश्यक ती आकडेवारी सर्व पक्षांसोबत शेअर केल्याचा दावाही करण्यात आला.


ही बातमी वाचा: