या डेऱ्यामध्ये दिलं जाणारं अवैध शस्त्रं प्रशिक्षण, अवैध धंदे अशा अनेक गोष्टी आज लोकांपुढे येणार आहेत.
हरियाणातल्या सिरसामधला हा डेरा, ज्याला आश्रम म्हटलं जातं, ते एक प्रकारे बाबा राम रहीमचं मुख्यालय होतं.
निवृत्त न्यायाधीशांच्या उपस्थितीत आज इथला प्रत्येक कोपरा तपासला जाणार आहे. फक्त खोल्याच नव्हे, तर अनेक ठिकाणी खोदकामही होणार आहे. 60 कॅमेरांमध्ये ही सर्च मोहीम कैद होणार आहे. तब्बल 700 एकरवर पसरलेला हा डेरा अनेक ऐशोआरामाच्या साधनांनी सज्ज आहे.
दोन साध्वींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुरमीत राम रहीम सध्या रोहतकमध्ये तुरुंगवासात आहे. त्याच
पार्श्वभूमीवर आता उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात येत आहे.