Har Ghar Tiranga : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त उजनी धारणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली होती. उजनी धरणातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. प्रत्येक व्यक्तीच्या व्हॉट्सअॅप स्टेट्सला हा व्हिडीओ आणि त्याचे फोटो होते. क्षणभरात राज्यभरात या व्हिडीओने धुमाकूळ घातला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केलाय. 


उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. यावेळी सांडव्यावर सोडण्यात आलेल्या तीन रंगाच्या रोषणाईमुळे धरण जणू भारतीय ध्वज असल्यासारखा भास होतो. पहिल्यांदाच या प्रकारे उजनी धरणाला रोषणाई करण्यात आली. या धरणाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. धरणाच्या पाण्यातील तिरंगा पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी उजनीवर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. 







हर घर तिरंगा अभियानाला मिळालेल्या अद्वितीय प्रतिसादाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद आणि अभिमान


हर घर तिरंगा अभियानाला मिळालेल्या अद्वितीय प्रतिसादाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, या अभियानात समाजातील विविध क्षेत्रातील लोकांचा विक्रमी सहभाग आपण पाहत आहोत. तिरंग्यासोबतचा फोटो harghartiranga.com  वर शेअर करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी नागरिकांना केले आहे. पंतप्रधानांनी 'हर घर तिरंगा' अभियानाची झलक देशभरातून आलेल्या छायाचित्राद्वारे ट्विटरवर दर्शवली आहे.‌  "#हर घर तिरंगा अभियानाला मिळालेल्या अद्वितीय प्रतिसादामुळे आनंद आणि अभिमान वाटतो. आम्ही विविध क्षेत्रातील लोकांचा विक्रमी सहभाग पाहत आहोत. आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. harghartiranga.com वर तिरंग्यासोबत तुमचा फोटो देखील शेअर करा." 






प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन
देशभरात 75 व्या स्वातंत्र्यदिनाची (Independence Day) तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. यंदा 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' (Azadi ka Amrit Mahotsav) मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून 'आजादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.