Har Ghar Tiranga LIVE : 'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात, राज्यभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह; प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...
Har Ghar Tiranga Campaign LIVE : देशभरात आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. यासंबंधित प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...
Solapur - जिल्हा परिषदेत आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम अंतर्गत हुतात्मा स्मृती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या मार्गावर महिलांची विशेष स्वदभावना रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये CEO दिलीप स्वामी , उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज बीड शहरामध्ये भव्यदिव्य तिरंगा रॅली काढण्या आली होती. भाजपाचे सलीम जहाँगीर यांनी 262 फुटांचा तिरंगा ध्वज बनवला असून या रॅलीमध्ये खा. प्रितम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.. आज सकाळी 262 फुटाचे तिरंगा ध्वज घेऊन शहरातून रॅली काढण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा' अभियानाच्या जनजागृतीसाठी धुळ्यातील जमीयत उलेमा हिंद यांच्यावतीने शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. आमदार फारुक शाह यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मुस्लिम समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या रॅलीमुळे शहर तिरंगामय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहराच्या विविध भागातून निघालेल्या या तिरंगा रॅलीचा देवपूर बस स्थानक येथे समारोप करण्यात आला. यावेळी मुस्लिम धर्मीय बांधवांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशभरात तिरंगा उपक्रमाचं आयोजन घाटकोपर येथील शिवाजी शिक्षण संस्था येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळेतील 750 विद्यार्थ्यांनी भारतीय राष्ट्रधजावर आधारित विविध आकार शाळेच्या मैदानात साकारले. ज्यात सारेजहासें अच्छा व इतर स्वातंत्र्यावर आधारित गाण्याच्या तालावर नऊ फुट बाय 13.5 फूट आकाराचा झेंडा साकारुन त्यात विविध छटा सादर केल्या. तसेच विद्यार्थ्यांनी विशिष्ठ पद्धतीने उभे राहून अमृतमहोत्सवाचा 75 हा अंक साकारून त्या भोवती 75 तिरंगी ओढनी घेतलेल्या मुलींनी गोलाकार फिरून तिरंगाची प्रतिकृती साकारली. भारतातील महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, राजस्थान, काश्मिर, पंजाब, केरळा या सारख्या नऊ राज्यांच्या पारंपारिक गणवेश परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी तिरंगा हाती घेऊन संघराज्य एकीचे दर्शन घडविले तसेच शहीद भगतसिंह, राजगुरु, सुखदेव, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी इत्यादी व्यक्तीरेखा साकारुन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांना ध्वजवाटपही करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याने देशभरात अमृत महोत्सव साजरा केला जातोय. समाजातील विविध घटकांनी यात आपला सहभाग नोंदवला आहे. आज परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. पोलीस मुख्यालयापासून निघालेल्या या रॅलीत सर्व अधिकारी, कर्मचारी हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले होते. शिवाय पोलीस व्हॅन, दुचाकी वरील पोलीस ही शहर वासियांचे लक्ष वेधून घेत होतं.
आजपासून देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा' या उपक्रमाची सुरवात झाली. याच उपक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील जिल्हापरिषदेच्या विद्यार्थ्यांनी तब्बल अखंड अशा पंच्याहत्तर फुटाच्या पत्रांचं लेखन केलंय. या पत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या भावना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केल्या. या पत्राच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांचा आविष्कार दाखवीत विविध चित्र काढले. आपल्या मनातल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या कविता चारोळ्या या माध्यमातून विद्यार्थी पत्रातून व्यक्त केलं आहे. पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला.विद्यालयाचे शिक्षक गोपाल खाडे आणि विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला. या कार्यक्रमाला पत्र लेखनासाठी कारंजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने उपस्थित होते.
देशभरात 75 व्या स्वातंत्र्यदिनाची (Independence Day) तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. यंदा 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' (Azadi ka Amrit Mahotsav) मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून 'आजादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
परळीत 150 फूट उंच तिरंगा ध्वजाचं लोकार्पण आज करण्यात आलं. परळी नगर परिषदेच्या माध्यमातून वैद्यनाथ कॉलेजच्या पाठीमागील डोंगरावर हा ध्वज आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने या स्फूर्तीस्थळाचे लोकार्पण माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण (Independence Day) होत आहेत. यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरात आज भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. 320 फूट लांब आणि नऊ फूट रुंद आकाराचा तिरंगा हे या पदयात्रेचं मुख्य आकर्षण होतं. राष्ट्रीय सेवा योजनेचे 700 हून अधिक स्वयंसेवक या तिरंगा पदयात्रेत सहभागी झाले होते. लेझिम पथकासंह सुरु होणारी ही पदयात्रा क्रीडा संकूल ते महात्मा जोतिबा फुले परीक्षा भवन ते फिरोजशहा मेहता भवन ते गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्था ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन असा प्रवास करत पुन्हा क्रीडा संकूल येथे या भव्य पदयात्रेचा समारोप झाला.
जालना जिल्ह्यातील मंठा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 501 फुटी विक्रमी तिरंगा रॅली काढण्यात आली ,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहरातील स्वामी महाविद्यालयात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा रॅली काढण्यात आली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त शासनाच्या 'हर घर तिरंगा' या उपक्रमाअंतर्गत मालेगाव शहरामध्ये आज भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. मालेगाव शहरांच्या लहूजी नगरमधून ही भव्य दिव्य रॅली काढण्यात आली. शहरातील विविध चौकातून मार्गक्रमण करत अनेक जातीधर्माच्या महिला पुरुषांनी एकत्र येत मोटर सायकल रॅली काढली. या रॅलीत प्रत्येक जाती-धर्माच्या नागरिक आपआपल्या मोटरसायकलसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त परळी शहरात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीमध्ये स्वतः पंकजा मुंडे यांनी सहभाग घेतला असून ढोल पथकात ढोल वाजवून पंकजा मुंडे अमृत महोत्सवाच्या उत्सवात सहभागी झाल्या आहेत. हर घर तिरंगा अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली असून यामध्ये शालेय विद्यार्थी विविध संस्थांचे पदाधिकारी शिक्षक वकील सहभागी झाले आहेत. तर परळीकर देखील या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले. सबंध परळी शहरात देश भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केला जात असून, त्यानिमित्ताने प्रशासनाकडून अनेक अभियान राबवले जात आहे. दरम्यान औरंगाबादमध्येही 100 फुट स्मारकध्वजचे लोकार्पण सोहळा पार पडतोय. औरंगाबाद जिल्हा प्रशासनाच्या वतीने 100 फुट स्मारकध्वज उभारण्यात येत आहे. शहारतील शासकीय कला महाविद्यालय शेजारी असलेल्या किलेअर्कमध्ये हा 100 फुट स्मारकध्वज उभारण्यात येत आहे.
औरंगाबादच्या दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यावर भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे. देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केला जात असून, त्यानिमित्ताने प्रशासनाकडून अनेक अभियान राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय पुरातत्व विभागाकडून औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक स्थळांवर राष्ट्रध्वज फडकवत रोषणाई केली आहे. दौलताबाद किल्ल्यावर फडकवण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचे काही क्षण ड्रोन कॅमऱ्यातून टिपण्यात आली आहे.
'हर घर तिरंगा' या उपक्रमाअंतर्गत कोल्हापूर शहरातील 303 फुटी राष्ट्रध्वज सलामी कार्यक्रम सुरू झाला आहे.
यंदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त केंद्र सरकारकडून आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पार्श्वभूमी
Har Ghar Tiranga Campaign : भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण (Independence Day) होत आहेत. यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात
भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनूसार हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत असून राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
तिरंगा कधी फडकवता येईल?
'हर घर तिरंगा' अभियानाचा देशभरात उत्साह आहे. यापूर्वी देशात तिरंगा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावण्याचा नियम होता. जुलै 2022 मध्ये सरकारनं या नियमात सुधारणा केली आणि त्यानंतर आता रात्रंदिवस राष्ट्रध्वज फडकवता येणार आहे.
पंतप्रधान मोदींनी केलं होतं आवाहन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्ऱधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' या अभियानाची घोषणा केली होती. यावेळी देशभरातील जनतेला त्यांच्या घरावर किंवा कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये तिरंगा विक्रीही करण्यात आली.
पोस्ट ऑफिसमधून असा खरेदी करा तिरंगा
पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवर www.epostoffice.gov.in भेट देऊन तुम्ही घरबसल्या तिरंगा खरेदी करु शकता. या वेबसाईटला भेट दिल्यानंतर होम पेजवर तिरंगा दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. या ठिकाणी लॉग ईन केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर तसेच किती संख्येने तिरंगा पाहिजेत याची नोंद करावी लागणार आहे. त्यानंतर ऑर्डर कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला पेमेंट प्रोसेस पूर्ण करावं लागेल. तुम्ही जर एकदा ऑर्डर केली तर तुम्हाला ती रद्द करता येणार नाही. पोस्टातून तिरंगा खरेदी करण्यासाठी तुम्हाला 25 रुपये खर्च करावे लागतील. पोस्ट ऑफिसने 1 ऑगस्टपासून तिरंगा विक्रीला सुरुवात केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -