नवी दिल्ली : नक्षलवाद्यांच्या धमक्यांना घाबरणार नाही, त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. असं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलत होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदीही नक्षल्यांच्या निशाण्यावर होते. माजी पंतप्रधान राजीव गांधींसारखाच घातपात कऱण्याचा नक्षलवाद्यांचा प्लॅन होता, असं सरकारी वकिल उज्वला पवार यांनी पुणे सत्र न्यायालयात सांगितलं होतं.

नक्षलवाद्यांनी एम 4 नावाचं शस्त्र आणि त्यासाठी 4 लाख राऊंड खरेदी करण्याची तयारी असल्याचा धक्कादायक माहिती पोलिसांनी मिळाली, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या देणारी दोन पत्रं मंत्रालयात आली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेविषयी अधिक सतर्क राहण्याचे आदेश राज्याच्या गृह विभागानं सुरक्षा यंत्रणेला दिले आहेत.