नवी दिल्ली : प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबिबचा (Jawed Habib Viral Video) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याध्ये जावेद हबिब एका महिलेचे केस कापताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचे कारण म्हणजे केस कापताना जावेब हबीबने केलेला किळसवाणा प्रकार. जावेद हबिब केस कापताना चक्क थुंकीचा वापर केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
व्हिडीओमध्ये दावा केला आहे की, जावेद हबिब केस कापताना पाण्याचा वापर न करता आपल्या थुंकीचा वापर करत आहे. एवढच नाही तर या थुंकीत जादू आहे, असे देखील तो व्हिडीओमध्ये म्हणाला आहे. या व्हिडीओनंतर जावेद हबिबवर टीका होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलेची प्रतिक्रिया समोर आली आहे. मात्र अद्याप जावेद हबिबची बाजू समोर आलेली नाही.
जावेद हबीबचा हा व्हिडीओ मुजफ्फरनगर येथील आहे. व्हिडीओमध्ये जावेद हबिब एका महिलेला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलवले. केस कापताना जावेद हबिब म्हणाला, "माझे केस खराब आहे, कारण मी शॅम्पू केलेला नाही. लक्षपूर्वक ऐका आणि पाण्याची कमतरता आहे... ( असे बोलताना महिलेच्या केसात थुंकला) आणि या थुंकीत जादू आहे". दरम्यान ज्या महिलेचे केस कापत होते तेव्हा त्या महिलेला देखील ही गोष्ट खटकली. त्यानंतर महिलेची प्रतिक्रिया समोर आली आहे. जावेद हबीब ज्या महिलेच्या केसात थुंकले त्या महिलेचे नाव पूजा गुप्ता आहे.
महिलेने व्हिडीओ ट्वीट करत आपली बाजू मांडली आहे. महिला आपल्या व्हिडीओमध्ये म्हणाली, "माझे नाव पूजा गुप्ता आहे. वंशिका ब्यूटी पार्लर या नावाने माझे पार्लर सुरू आहे. मी बडौत येथे राहणारी आहे. मी काल जावेद हबीब सरांच्या कार्यशाळेला गेले होते. त्यांनी केस कापण्यासाठी मला स्टेजवर बोलवले. त्यांनी माझ्याशी गैरवर्तन केले. त्यांनी पाणी नसेल तर थुंकीचा वापर करत हेअर कट कसा करायचा हे दाखविले. त्यानंतर मी हेअरकट नाही केला. या प्रकारानंतर मी परत कधीच जावेद हबीबकडे केस कापणार नाही".
महत्त्वाच्या इतर बातम्या :