Bulli Bai App Case : 'बुली बाई' अ‍ॅप तयार करणाऱ्या मुख्य आरोपीला दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने आसाममधून अटक केली आहे. डीसीपी केपीएस मल्होत्रा ​​यांच्या पथकाने आसाममधून अटक केली आहे. या आरोपीचं नाव नीरज असून हा गिथहब (Githhub) वरून अ‍ॅप बनवणारा मुख्य आरोपी आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नीरजने बुली बाईला गिथहब अ‍ॅपद्वारे बनवले होते. 


नीरज हा गिथहबवर बुली बाई अ‍ॅप तयार करणारा हा मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी नीरज बिश्नोई हा सुमारे 21 वर्षांचा आहे. दिल्ली पोलीस आसामहून आरोपीसह दिल्लीला रवाना झाले आहेत. ते दुपारी 3.30 पर्यंत विमानतळावर पोहोचेल.


यापूर्वी, दिल्ली महिला आयोगाने 'बुली बाई' आणि 'सुली डील' अ‍ॅप्सवरील आक्षेपार्ह सामग्रीच्या चौकशीच्या संदर्भात या आठवड्याच्या अखेरीस दिल्ली पोलिसांना हजर राहण्यास सांगितले आहे. दिल्ली महिला आयोगाने सोमवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, 'गिटहब' अ‍ॅपवर अनेक मुस्लिम महिलांचे फोटो त्यांच्या संमतीशिवाय अपलोड केल्याबद्दल मीडिया रिपोर्ट्सची स्वतःहून दखल घेतली. आयोगाने दिल्ली पोलिसांना हजर राहून 'सुली डील' आणि 'बुली बाई' प्रकरणात अटक केलेल्यांची यादी करण्यास सांगितले.


दिल्ली महिला आयोगाने जारी केलेल्या आवेदनात म्हणले आहे की, ''अशा गंभीर प्रकरणातील आरोपींना अटक न होणे हे अस्वस्थ करणारे आहे आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींच्या या भूमिकेमुळे महिला आणि मुलींची ऑनलाइन विक्री आणि इतरांना शिक्षा झालेल्यांचे मनोबल वाढले आहे."  काही अज्ञात लोकांच्या गटाने 'गिटहब' वापरून शेकडो मुस्लिम महिला आणि मुलींचे मॉर्फ केलेले फोटो एका अॅपवर अपलोड केले आहेत आणि ते 'बुली डील ऑफ द डे' म्हणून शेअर केले आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA