नवी दिल्ली : लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद पाण्याच्या मार्गाने भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. लष्कर-ए-तोयबाचे 8-9 दहशतवादी जम्मूतील निक्की तवी आणि बडी तवी नदीच्या परिसरात दबा धरुन बसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

हाफिज सईदने लष्कर कमांडर अबू इरफान टांडेवाला याच्यावर निक्की तवी आणि बडी तवी या परिसरातून भारतात घुसखोरी करण्याची जबाबदारी सोपवली आहे. महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत करत असल्याचंही कळतं.

गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनंतर जम्मूमधील नदी आणि नाले, जिथे घुसखोरीची शक्यता सर्वाधिक आहे, तिथली सुरक्षा अधिक वाढवली आहे. बीएसएफने विविध ठिकाणांवरील सुरक्षेत वाढ केली आहे.