दीपिका चौहानचा 27 ऑक्टोबरला मृत्यू झाला होता. पती विक्रमनेच दीपिकाची हत्या केल्याचा शेजाऱ्यांना संशय होता. 'प्लीज माझा जीव घेऊ नकोस. माझं आपल्या मुलांवर खूप प्रेम आहे' हे दीपिकाचे अखेरचे शब्द शेजाऱ्यांच्या कानावर पडले होते. हा आरोप करणाऱ्या शेजाऱ्यांनी आपली ओळख उघड करण्यास किंवा चौकशीत सहभागी होण्यास नकार दिला.
आरोपी पतीच्या हातावर खूणा आढळल्यामुळे हत्येपूर्वी दोघांमध्ये झटापट झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. दीपिकाला विक्रमच्या विवाहबाह्य संबंधांची कुणकुण लागल्यामुळेच त्याने तिचा काटा काढण्याची तयारी सुरु केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. शेफाली भसीन नावाच्या ब्लॉगर तरुणीशी विक्रमचे प्रेमसंबंध होते.
27 ऑक्टोबरला करवाचौथ असल्यामुळे दीपिका सातत्याने पतीला फोन करत होती. मात्र विक्रम उशिरा घरी परतला. त्यामुळे दीपिकाने शेफालीच्या घरी जाऊन जाब विचारणार असल्याची धमकी विक्रमला दिली. त्यानंतर विक्रमने आठव्या मजल्यावरुन ढकलून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.