- एअरो डायनॅमिक शैलीत बनवलेल्या या ट्रेनचा पुढील भाग बुलेट ट्रेन सारखा आहे.
- या रेल्वेत इंजिन नसून ड्रायव्हर कॅब असणार आहे.
- ड्रायव्हर कॅबचा कोच मिळून एकूण 16 डब्ब्याची ही रेल्वे असणार आहे, जे पूर्णपणे वातानुकूलित असतील.
- या सर्व डब्यात स्लायडिंग दरवाजे असतील, जे रेल्वे थांबल्यावर मेट्रो ट्रेनसारखे आपोआप उघडतील.
- तसेच ही रेल्वे प्रतितास 160 किमी धावेल. शिवाय त्यात वाय फायची सुविधा ही असेल.
- मेक इन इंडिया या योजनेअंतर्गत चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये ही रेल्वे बनवण्यात आली आहे.
- 18 महिन्यात तयार झाली आहे.
- ही रेल्वे बनवण्यासाठी 100 कोटी खर्च आला आहे.
- पुढील एक ते दीड महिने मुरादाबाद-सहारनपूर मार्गावर चाचणी होईल.
- या वर्षअखेरीस प्रवाशांसाठी रेल्वे रुळावर धावण्याची शक्यता.
देशातील पहिली विनाइंजिन टी-18 रेल्वे तयार
एबीपी माझा वेब टीम | 14 Nov 2018 08:30 PM (IST)
दिल्लीच्या सफदरजंग स्टेशनवर आज माध्यमांच्या प्रतिनीधींसाठी टी-18 ट्रेन आली होती. जिचा बाहेरील लुक माध्यमांना दाखवण्यात आला.
नवी दिल्ली : देशातील पहिली विनाइंजिन टी-18 रेल्वे तयार झाली आहे. दीड महिन्याच्या चाचणी नंतर टी-18 रेल्वे रुळावर धावणार असल्याची माहिती मिळत आहे. शताब्दी ट्रेनला पर्यायी टी-18 रेल्वे ही देशातील पहिली रेल्वे असणार आहे ज्यात इंजिन नसेल. या रेल्वेचे कोच हे सेल्फ पॉवर्ड असणार आहेत. टी-18 रेल्वे ही देशातील पहिली रेल्वे असेल जी युरोपियन रेल्वेना टक्कर देईल, असे सांगण्यात येत आहे. दिल्लीच्या सफदरजंग स्टेशनवर आज माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी टी-18 ट्रेन आली होती. या ट्रेनचा बाहेरील लूक माध्यमांना दाखवण्यात आला. भारतीय रेल्वे नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे. तसेच आम्ही युरोपियन दर्जा प्राप्त करु, असे रेल्वे अधिकारी राजेश अग्रवाल म्हणाले. आतापर्यंत रेल्वेचे डब्बे जुन्या तंत्रज्ञानावर आधारित होते. या रेल्वे सेटमध्ये डिस्ट्रीब्यूटर पॉवर असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली. टी-18 रेल्वेतील वैशिष्टये