गुरुग्राम : आपल्या डॉक्टर असलेल्या पत्नीच्या कारमध्ये अवैध्यपणे  GPS ट्रॅकिंग डिव्हाईस बसवले आणि तिच्यावर सातत्याने पाळत ठेवल्याची घटना घडली आहे. यावर त्या विचित्र स्वभावाच्या पतीवर गुरुग्राममध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


या प्रकरणी त्या डॉक्टर महिलेने तिच्या विचित्र स्वभावाच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे. त्या महिला डॉक्टरला कारमध्ये हातातून पडलेला मोबाईल शोधताना मारुती सुझुकी कारमध्ये GPS S20 हे पोर्टेबल ट्रॅकर यंत्र सापडले. त्यानंतर तिला धक्काच बसला. 


डॉक्टर महिलेने पोलिसांना याबाबत माहिती देताना सांगितलं की, "मी माझ्या कारमध्ये एका पेशंटची वाट पाहत बसलो होतो. त्यावेळे गियर बॉक्सजवळ मोबाईल ठेवत असताना तो माझ्या हातातून पडला. तो शोधताना तिला खाली काळ्या रंगाचा एक लहान बॉक्स सापडला. तो बॉक्स जो कारमध्ये फिक्स केला होता. मी अशा प्रकारचा कोणताही बॉक्स ठेवला नसल्याने हे माझ्यासाठी धक्कादायक होतं. मी त्यावेळी घाबरले. त्यानंतर मी तो बॉक्स ओढून काढला आणि उघडला. त्यामध्ये एक पोर्टेबल जीपीएस ट्रॅकर होतं."


त्यानंतर त्या महिलेने त्या जीपीएस ट्रॅकरचे फोटो आपल्या भावासोबत शेअर केले. त्या ट्रॅकरमध्ये एक सीम कार्ड होतं. त्यामुळे त्या महिलेच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात येत होती. ती कुठे जाते याची माहिती एका दुसऱ्या डिव्हाईसला पोहोचवली जात होती. त्यामुळे आपली प्रायव्हसी धोक्यात आल्याची तक्रार या महिलेने पोलिसांकडे केली आहे. 


कारमध्ये बसवण्यात आलेला तो जीपीएस ट्रॅकर आपल्या विचित्र स्वभावाच्या पतीनेच बसवला असल्याचा आरोप त्या डॉक्टर महिलेने केला आहे. आपल्या पतीने कार क्लिन करणाऱ्या कामगाराला हाताशी धरुन हे कृत्य केलं असल्याचं त्या महिलेचं म्हणणं आहे. आता या मुद्द्यावरुन त्या महिलने आपल्या पतीविरोधात कायदेशीर लढाई सुरु केली आहे. 


त्या महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आयपीसी कलम 354D (पाळत ठेवणे), 354C,506 आणि आयटी अॅक्ट 67 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


महत्वाच्या बातम्या :