Farmers Protest: शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान दिल्ली पोलिस आणि शेतकरी यांच्यात हिंसक चकमक पाहायला मिळाली. या संघर्षाची जबाबदारी पंजाबी अभिनेता दीप सिद्धूने स्वीकारली आहे. पण हरियाणाचे शेतकरी नेते आणि भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष गुरनामसिंह चदूनी यांनी दीप सिद्धू यांच्यावर खूप गंभीर आरोप केले आहेत. गुरनाम सिंह म्हणतात की दीप सिद्धू यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे.


गुरनाम सिंह यांनी मंगळवारी दीप सिद्धूला लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसक आंदोलनाला जबाबदार धरले आहे. भारतीय किसान युनियनच्या एका नेत्याने व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, “दीप सिद्धूने जे केले ते अत्यंत निंदनीय आहे. लाल किल्ल्याला जाण्याचा आमचा कोणताही निर्णय नव्हता. तो तेथे लपून गेला आणि लोकांनीही त्याचं बोलणं ऐकलं. तो लाल किल्ला घेईल हे त्याला माहित नव्हते."


Farmers Protest | लाल किल्ल्यावर फडकवलेला ध्वज नेमका कोणता? निशान साहिबबद्दल सर्वकाही


हिंसाचाराचा निषेध


गुरनामसिंह चदूनी यांनी सांगतिले की, दीप सिद्धू गेल्या काही काळापासून वारंवार शेतकरी नेत्यांविरूद्ध बोलत होते. हे शेतकर्‍यांचं आंदोलन आहे, धार्मिक आंदोलन नाही. तसेच शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचाराचा निषेधही गुरनामसिंह यांनी केला.


दरम्यान दिल्लीत (Republic Day 2021) दिनाच्या दिवशी कृषी कायद्याच्या निषेधार्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढण्याचा निर्णय़ घेतला. परेड निघाली, पण शांततापूर्ण मार्गाचा कुठेही अवलंब केला गेला नाही. कडेकोट सुरक्षा असतानाही आंदोलक शेतकऱ्यांनी सिंघु आणि गाझीपूर सीमेवरुन दिल्लीत प्रवेश केला. परंतु आंदोलक नियोजित मार्गावरुन हटले आणि ही रॅली हिंसक बनली. परिणामी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, लाठीमार करावा लागला. दिल्लीत पोलीस, सुरक्षा यंत्रणा आणि शेतकऱ्यांमध्ये एकच धुमश्चक्री पाहायला मिळाली. दगडफेक, धक्काबुक्की असंच एकंदर चित्र या रॅलीदरम्यान पाहायला मिळालं.


Farmers Protest | बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम : शरद पवार


दिल्लीतील शेतकरी आंदोलकांनी ट्रॅक्टर रॅलीत शांततेचा मार्ग का सोडला? दिल्लीत दिवसभरात काय काय घडलं?