गुडगाव(हरियाणा): गुडगावमधील सोहना भागात एका सुनेची दबंगगिरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या सुनेने सासु सासऱ्यांच्या घरात जबरदस्ती घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. मध्यस्थी करणाऱ्या नवऱ्यालाही या महिलेने झोडपलं. महिलेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

गुडगावमधील हा प्रकार 23 जुलै रोजी घडला. महिलेने सासऱ्याच्या घरात जबरदस्ती प्रवेश केला आणि मारपीट सुरु केली. पीडित वृद्ध दांपत्याने पोलिसांवर आरोप केले आहेत. पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेलो असता टाळाटाळ केली, असा आरोप वृद्ध दांपत्याने केला आहे.

 

का केली मारहाण?

आरोपी महिलेचा विवाह 18 वर्षांपूर्वी झाला. मात्र तिला 2012 पर्यंत कसलीही अपत्यप्राप्ती झाली नाही. त्यामुले महिलेने सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप केला. या खटल्याच्या सुनावणीसाठी सासरकडून कोणीही उपस्थित राहीलं नाही. त्यामुळे महिलेने संतापातून मारहाण केली.

 

पाहा व्हिडिओः