नवी दिल्ली : पीपली लाईव्ह सिनेमाचा सहाय्यक दिग्दर्शक महमूद फारुकीला साकेत कोर्टाने अमेरिकन महिलेवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं आहे. येत्या 2 ऑगस्ट रोजी दिल्लीतील साकेत कोर्ट महमूग फारुकीला शिक्षा सुनावणार आहे.
जून 2015 मध्ये 35 वर्षीय अमेरिकन महिलेने फारुकीविरोधात न्यू फ्रेण्ड्स कॉलनी पोलीस ठाण्यात बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली होती. दिल्लीतील सुखदेव विहारमध्ये बलात्कार केल्याचा अमेरिकन महिलेचा फारुकीवर आरोप होता.
पीपली लाईव्ह सिनेमाची मुख्य दिग्दर्शक अनुषा रिझवी या महमूद यांच्या पत्नी आहेत. महमूद पीपली लाईव्ह सिनेमाचे सहाय्यक दिग्दर्शक होते.