नवी दिल्ली: तब्बल 14 वर्षानंतर आज गुजरातमधील गुलबर्ग सोसायटी जळीत कांड प्रकरणाचा निकाल लागला आहे. याप्रकरणी विशेष कोर्टानं 24 आरोपींना दोषी ठरवलं आहे. तर 36 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे.
गुजरात दंगलीनंतर 2002 मध्ये काँग्रेसचे नेते एहसान जाफरी यांचं वास्तव्य असलेल्या गुलबर्ग सोसायटीला आग लावण्यात आली होती. त्यात एहसान जाफरींसह 69 जण मृत्यूमुखी पडले होते. या प्रकरणी एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया जाफरी गेल्या 14 वर्षांपासून न्यायालयात लढा देत आहेत.
दरम्यान एसआयटीनं भाजपचे स्थानिक नगरसेवक बिपीन पटलेसह 66 जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी 9 आरोपी गेल्या 14 वर्षांपासून तुरूंगात असून इतर आरोपी जामीनावर बाहेर आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विशेष SITनं याप्रकरणी तब्बल 335 साक्षीदार आणि 3000 कागदपत्र सादर केले गेले होते. 61 आरोपींच्या समोर निकाल सुनावण्यात येणार आहे. आज दुपारपर्यंत या प्रकरणी निकाल येण्याची शक्यता आहे.