जामनगर: नोटाबंदीनंतर काळा पैसा लपवण्यासाठी अनेकजण दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा करत आहेत. या प्रकारामुळे अनेकांना धक्के बसत असून असाच एक प्रकार गुजरातमध्ये काम करणाऱ्या मजूराच्या बाबतीतही घडला आहे. नोटा जमा होण्याच्या प्रकारात मुळचे बिहारमधील बेतियामधील एक मजूर एका रात्रीत कोरोडपती झाले आहेत. त्यांच्या खात्यात तब्बल एक कोटी 17 लाख रुपये जमा झाले आहेत.
मुळचा बिहारमधील बेतियाचे रहिवासी पण गुजरातमधील जामनगरमध्ये रिलायन्सच्या रिफायनरीत वेल्डर म्हणून काम करणारा बद्री साहनी यांना महिन्याला 16 हजार रुपये पगार मिळतो. बद्री गेल्या दोन महिन्यापासून बिहारमधील आपल्या घरी आले आहेत.
त्यांचे बँक खाते गुजरातच्या जामनगरमधील बँक ऑफ इंडिया शाखेत आहे. सुट्टीवर आपल्या घरी आलेले बद्री शुक्रवारी जेव्हा बँकेतून पैसे काढण्यासाठी गेला, तेव्हा त्यांच्या बँक खात्यावरील रक्कम पाहून त्यांना धक्काच बसला. कारण त्याच्या खात्यावर तब्बल एक कोटी 17 लाख रुपये जमा होते. आपल्या खात्यातील रक्कम पाहून आश्चर्यचकीत झालेल्या, बद्री यांनी याची माहिती तत्काळ बेतिया यांची माहिती तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात दिली.
यानंतर बेतिया पोलिसांनी याबाबतची माहिती आयकर विभागाला दिली असून, त्याच्या बँक खात्यामध्ये इतके पैसे आले कुठून याचा तपास करण्यात येत आहे. यासाठी बद्री साहनी यांचे खाते सील करण्यात आले आहे.