अहमदाबाद : काळ्याचं पांढरं करण्याच्या संशयातून गुजरातेतील प्रसिद्ध व्यावसायिक जिग्नेश भजियावालाला अटक करण्यात आली आहे. ईडीनं मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ही कारवाई केली आहे. नोटाबंदीदरम्यान सूरतमधील भजियावालानं मोठ्या प्रमाणावर जुन्या नोटा बदलून दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

जिग्नेश भजियावाला सूरतमधील प्रसिद्ध उद्योगपती किशोर भजियावाला यांचा मुलगा आहे. नोटाबंदीदरम्यान त्याच्या घरी टाकलेल्या छाप्यात एक कोटी दोन लाखांच्या नव्या नोटा जप्त केल्या होत्या, तसंच त्याच्या चारशे कोटींच्या संपत्तीची चौकशीही सुरु आहे.

https://twitter.com/dir_ed/status/822366165242552322

भजियावालाचा काही बँक अधिकाऱ्यांशी संबंध असण्याचा ईडीला संशय आहे. जिग्नेशनं नोटा बदलण्यासाठी 1000 आयडींचा वापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यात भजियावाला ग्रुपमध्ये काम करणाऱ्या 700 कर्मचाऱ्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावल्याचं बोललं जात आहे. जिग्नेशसोबत या नोटाबदलीमध्ये आणखी किती लोक सामील आहेत, याचा तपास ईडीकडून सुरु आहे. आज जिग्नेशला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

दरम्यान नोटाबंदीनंतर एका कार्यक्रमात नोटा उधळण्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

संबंधित बातम्या :

गुजरातमधला चहावाला ‘ब्लॅकमनी किंग’, एकूण संपत्ती 650 कोटी रुपये!