नवी दिल्ली : गुजरातमधील सहा केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या केंद्रांवर दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं होतं. निवडणूक आयोगाने तांत्रिक कारण पुढे करत पुन्हा मतदान घेणार असल्याचं सांगितलं. शिवाय सध्याचा डेटा हटवण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने दहा मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून मतमोजणी करण्याचेही आदेश दिले आहेत. ज्या केंद्रावर पुन्हा मतदान होणार आहे, तिथे मॉक ड्रील म्हणजे मतदानापूर्वी केलेल्या अभ्यासाचा डेटा हटवण्याचं अधिकारी विसरले होते. त्यामुळे पुन्हा नव्याने मतदान घेण्यात येणार आहे.
वडगाम विधानसभा मतदारसंघातील छानियां-1 आणि छानियां-2, विरमगाम विधानसभा मतदारसंघातील बूथ नंबर 27, दस्करोई विधानसभा मतदारसंघातील नारोदा मतदान केंद्र, सावली क्षेत्रातील नहारा-1 आणि सकारदा-7 या ठिकाणी पुन्हा निवडणूक होणार आहे. दलित नेता जिग्नेश मेवानी यांनी वडगाम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.
निवडणूक आयोगाने विसनगरच्या रालिसन 3, बेचराजीच्या पीलुद्रा 1 आणि कटोसन 3, मोडासाच्या जमाथा, वेजलपूरच्या वेजलपूर 58, वाटवाच्या वस्त्रल 55, जमालपूर-खादियाच्या खादिया 16, सावलीच्या पिलोल 2 आणि सनखेडा मतदारसंघातील गोजपूर आणि सोंगीर मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून मतमोजणी होणार आहे.
गुजरात : सहा केंद्रांवर पुन्हा मतदान, निवडणूक आयोगाचे आदेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Dec 2017 10:45 PM (IST)
या केंद्रांवर दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं होतं. निवडणूक आयोगाने तांत्रिक कारण पुढे करत पुन्हा मतदान घेणार असल्याचं सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -