गांधीनगर : गुजरातमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच असून 2021 साली गुजरातमध्ये 2,73,056 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. 2020 सालच्या तुलनेत ती कमी असली तरी गेल्या दहा वर्षांचा विचार करता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतंय. 2020 साली गुजरातमध्ये 3,81,056 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. अनुसूचित जातींच्या विरोधात होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये गुजरातमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीतून हे स्पष्ट झालं आहे.
हत्येच्या घटनांत घट
गेल्या 10 वर्षांचा विचार करता गुजरातमध्ये हत्येच्या घटनांमध्ये सातत्याने घट होत असल्याचं दिसून येतंय. 2012 साली गुजरातमध्ये हत्येच्या 1.126 घटनांची नोंद करण्यात आली होती. तर 2021 साली 1,010 घटनांची नोंद करण्यात आली आहे.
महिलांविरोधातील गुन्ह्यांत घट
गुजरातमध्ये 2020 सालच्या तुलनेत 2021 साली महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनांमध्ये घट झाली आहे. 2020 साली एकूण 8,028 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती तर 2021 साली 7,348 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ
गुजरातमध्ये अपहरणाच्या घटनांमध्ये 2020 सालच्या तुलनेत काहीशी वाढ झाल्याचं चित्र आहे. 2020 साली अपहरणाच्या 1,222 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. 2021 साली त्यामध्ये वाढ होऊन ती 1,674 इतकी झाली आहे.
बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोने दिलेल्या आकडेवारीनुसार गुजरातमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. 2021 साली 473 गुन्ह्यांची नोंद होती, तर 2020 साली ती 486 इतकी होती. 2021 साली बलात्काराच्या 589 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
चोरीच्या घटनांमध्ये मोठी घट
गुजरातमध्ये गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत घट झाल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट होतंय. 2012 साली चोरीच्या 15,952 घटनांची नोंद करण्यात आली होती. 2020 साली त्यामध्ये घट होऊन ती 9,531 वर पोहोचली. 2021 साली चोरीच्या 10,711 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती-जमातींवरोधात गुन्हे
गुजरातमध्ये गेल्या 10 वर्षांचा विचार करता अनुसूचित जाती आणि जमातींवरोधीतल गुन्ह्यांच्या संख्येत सातत्यता आहे. 2020 साली अनुसूचित जातींविरोधात 1,326 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती, तर 2021 साली 1201 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.
अनुसूचित जमातींविरोधातील गुन्ह्यांचा विचार करता 2020 साली 291 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. तर 2021 साली ती संख्या 341 इतकी झाली.