Draupadi Murmu Britain Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आजपासून दोन दिवसीय ब्रिटन (Britain)  दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लंडन दौरा करणार आहेत. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर सोमवारी 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. महाराणीचं पार्थिव बकिंगहॅम पॅलेसमध्ये (Buckingham Palace) ठेवण्यात आलं आहे. 


ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झालं. त्यानंतर मंगळवारी त्यांचं पार्थिव इंग्लंडमध्ये दाखल झालं. त्यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचं पार्थिव लंडनमधील (London) विंडसर येथील किंग जॉर्ज चतुर्थ मेमोरियल चॅपलमध्ये दफन करण्यात येईल. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) देखील लंडनला जाणार आहेत. भारत सरकारच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 17 ते 19 सप्टेंबर 2022 रोजी लंडनमध्ये असतील.


परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या 70 वर्षांच्या कारकिर्दीत भारत आणि ब्रिटनमधील संबंध अधिक विकसित आणि घनिष्ट झाले आहेत. त्यांनी जगभरातील लाखो लोकांसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराणी एलिझाबेथ यांचं 8 सप्टेंबर रोजी वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालं, त्यानंतर आता 19 सप्टेंबर रोजी त्यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची ब्रिटिश उच्चायुक्तालयाला भेट


ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज राजकारण्यांनी शोक व्यक्त केला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी 12 सप्टेंबर रोजी ब्रिटीश उच्चायुक्तालयात जाऊन भारताच्या वतीने महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.


महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं 8 सप्टेंबरला निधन


महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. वाढतं वय आणि प्रकृती अस्वास्थामुळे एलिझाबेथ यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आली होती. फार मोजक्याच कार्यक्रमात त्या उपस्थित राहत होत्या. वयोमानामुळे त्यांच्या शारिरीक हालचालींवरही बंधने आली होती. त्यानंतर शुक्रवारी त्यांचे निधन झालं.  


महत्त्वाच्या इतर बातम्या