Gujarat Assembly Elections 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात जामनगर उत्तरमधून क्रिकेटर रवींद्र जाडेजाची (Ravindra Jadeja) पत्नी रिवाबा जाडेजाला (Rivaba Jadeja) निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. 3 वर्षांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेल्या रिवाबा यापूर्वीही खूप चर्चेत होत्या. दरम्यान गुजरात विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य तसेच भाजपचा बालेकिल्ला असल्याने गुजरातची निवडणूक रंजक होणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष गुजरात निवडणुकीकडे लागले आहे. या सगळ्यात आता गुजरातमधील जामनगरची जागाही खूप चर्चेत आहे. याचे कारण येथील उमेदवार आहेत.


कोण आहे रिवाबा जडेजा? नणंद-भावजय आमने-सामने?


रिवाबा जाडेजा या राजकोटच्या निवासी आहे. त्यांचे वडील उद्योगपती आहेत. मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्या रिवाबा अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांनी 2016 मध्ये क्रिकेटर रवींद्र जाडेजासोबत लग्न केले. रिवाबा हे राजपूत समाजाच्या करणी सेनेच्या नेत्या आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. रिवाबा जाडेजा हे काँग्रेस नेते हरिसिंह सोलंकी यांचे नातेवाईक आहेत. जाडेजा कुटुंबाचे राजकोटमध्ये रेस्टॉरंटही आहे. रवींद्र जाडेजाचे वडील अनिरुद्ध सिंग आणि बहीण नैना हे देखील राजकारणात सक्रिय आहेत. नैना जामनगरमध्ये महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसही नैना यांना तिकीट देऊ शकते, असे बोलले जात आहे.


नणंद आणि भावजय या दोघींमध्ये वाद?
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा आणि बहीण नैना जाडेजा वेगवेगळ्या पक्षात आहेत. नणंद आणि भावजय या दोघींमध्ये भांडण झाल्याच्या बातम्याही आल्या आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जाडेजाच्या पत्नी रिवाबाने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच जाडेजाची बहीण नैना देखील काँग्रेसमध्ये सामील झाली होती. नयना काँग्रेसमध्ये आल्यापासून त्या खूप सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे. 


रवींद्र जडेजा कोणाला पाठिंबा देणार?


जर रवींद्र जाडेजाच्या बहिणीलाही कॉंग्रेसमधून जर तिकीट मिळाले? त्यानंतर बहीण-पत्नी एकाच जागेवरून निवडणूक लढवणार असतील? तर रवींद्र जडेजा कोणाला पाठिंबा देणार? एकीकडे भाऊ धर्म तर दुसरीकडे पती धर्म.  काँग्रेस आणि भाजपसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. 


संबंधित बातम्या


केवळ 14 महिलांनाच तिकीट, गुजरात निवडणुकीसाठी भाजपची 160 उमेदवारांची यादी जाहीर