Gujarat Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्ये 12 जून रोजी एअर इंडियाचं विमान कोसळल्याची भयावह दुर्घटना घडली. या घटनेनं संपूर्ण देश हादरला. सदर विमान अपघातामध्ये आतापर्यंत एकूण 275 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 241 विमानातील प्रवासी, ज्यामध्ये 12 क्रू मेंबर्स होते. अपघाताच्यादरम्यान ज्या बीजे मेडिकल कॉलेजवर विमान कोसळले त्या वसतिगृहाच्या इमारतीत 60 हून अधिक डॉक्टर, विद्यार्थी आणि काही इतर लोक उपस्थित होते. त्यापैकी 34 जणांचा मृत्यू झाला आहे. तर विमानातील एक प्रवासी वाचला. सध्या या अपघाताची चौकशी सुरु करण्यात आली आहे. यादरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

अपघातग्रस्त झालेल्या एआय 171 या विमानाचे पायलट सुमित सभरवाल (Sumeet Sabharwal) होते. विमानानं अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टी 23 वरून दुपारी 1.39 वाजता उड्डाण केलं. उड्डाण घेताच, जवळच्या एटीसीला मेडे कॉल पायलटकडून दिला गेलेला, पण त्यानंतर विमानानं एटीसीला कोणताही सिग्नल दिला नाही. उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान क्रॅश झालं. पायलट सुमित सभरवाल यांचे शेवटचे शब्द ठरले, ते म्हणजे, MAYDAY… MAYDAY… MAYDAY… NO POWER… NO THRUST… GOING DOWN…", पायलट सुमित सभरवाल यांचा ही अवघ्या 4 सेकंदाची ऑडिओ क्लिप होती. 

MAYDAY Call म्हणजे काय?

कोणत्याही विमानात, 'मेडे कॉल' हा एक आपत्कालीन संदेश असतो, जो विमान गंभीर संकटात असताना आणि प्रवाशांच्या किंवा क्रूच्या जीवाला धोका असताना पायलट देतो. जसं की, विमानाचं इंजिन निकामी होणं, विमानाला आग लागणं, विमानाची हवेत कोणत्याही गोष्टीशी टक्कर होण्याचा धोका किंवा हायजॅकसारखी परिस्थिती. या कॉलद्वारे, कोणताही पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) आणि जवळच्या विमानांना विमानाला तात्काळ मदतीची आवश्यकता असल्याचं सूचित करतो. विमानाच्या रेडिओवर तीन वेळा "MAYDAY, MAYDAY, MAYDAY" असं म्हटलं जातं, जेणेकरून हे स्पष्ट होईल की, हा कोणताही विनोद नाही तर, एक वास्तविक संकट आहे. माहितीनुसार, MAYDAY कॉल देताच, नियंत्रण कक्ष त्या विमानाला प्राधान्य देतो आणि त्याला मदत करण्यासाठी सर्व संसाधने वापरतो, जसं की, आपत्कालीन लँडिंगची परवानगी, विमानाच्या एमर्जंन्सीसाठी धावपट्टी रिकामी करणं, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल तयार ठेवणं. 'MAYDAY' हा शब्द फ्रेंच शब्द "माएडर" पासून आला आहे, ज्याचा अर्थ मला मदत करा. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की जर परिस्थिती खूप गंभीर नसेल पण चिंतेचा विषय असेल, तर पायलट पॅन-पॅन कॉल करतो, जो 'मेडे' पेक्षा कमी गंभीर मानला जातो.

संबंधित बातमी:

Gujarat Air India Plane Crash: आयुष्यात पहिल्यांदाच विमान बघितलं, व्हिडीओ काढला तो थेट अहमदाबाद विमान अपघाताचा, शूट करणाऱ्या आर्यनची कहाणी!

Air India Plane Crash In Ahmedabad: दोन एअर होस्टेस, काका-काकी जळत होते; मी विमानातून सीटसह बाहेर फेकला गेलो, बचावलेल्या प्रवाशाने थरार सांगितला!