नवी दिल्ली : सॅनिटरी नॅपकिन जीएसटीच्या कक्षेतून काढून टाकण्यात आले असून, वॉशिंग मशीन, फ्रिज, दागिन्यांचे बॉक्स इत्यादी अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत.

जीएसटी कौन्सिलने आजच्या बैठकीत 28 टक्के जीएसटी गटात असणाऱ्या अनेक वस्तूंवरील कर कमी करण्यात आला. दरम्यान जीएसटी कौन्सिलची पुढील बैठक 4 ऑगस्टला केरळमध्ये होणार आहे. त्या बैठकीत अजून काय महत्वाचे निर्णय होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, आजच्या बैठकीत ज्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आलं आहे, त्यांची अंमलबजावणी 27 जुलैपासून सुरु केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी दिली.

या वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर

- फ्रिज

- व्हिडीओ गेम्स,

- लिथियम आयन बॅटरी

- टीव्ही (27 इंचांपर्यंत)

- वॉशिंग मशीन

- व्हॅक्युम क्लीनरस,

- फूड ग्राइंडर

- मिक्सर

- स्टोरेज वॉटर हिटर

- ड्रायर

- रंग

- वॉटर कूलर

- मिल्क कूलर

- आईस्क्रीन कूलर

- परफ्युम

- टॉयलेट स्प्रे

 

या वस्तूंवरील जीएसटी 18 टक्क्यांवरुन 12 टक्क्यांवर

- दागिन्यांचे बॉक्स

- हॅण्डबॅग

- पेटिंगसाठीचे लाकडी बॉक्स

- आर्टवेअर ग्लास

- हातांनी बनवलेले लॅम्प

- बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तू

- बांधकामासाठी वापरात येणारे कोटा दगड, सॅण्ड स्टोन
तसेच, इथेनॉलवरील 18 टक्क्यांच्या करात कपात करुन,  5 टक्क्यांवर आणला गेला आहे. शिवाय, एक हजार रुपयांपर्यंतच्या पादत्राणे आणि बुटांवरही 5 टक्के कर करण्यात आला आहे.