पॅरिस : देशातील सर्वात अवजड उपग्रहाचे म्हणजेच GSAT 11 चे मध्यरात्री 2 वाजता यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. GSAT 11 या उपग्रहामुळे भारतात इंटरनेट क्षेत्रात क्रांती होईल,असा दावा केला जात आहे. या उपग्रहाच्या साहाय्याने भारतात प्रत्येक सेकंदाला 100 गीगाबाइटपेक्षा अधिक ब्रॉडबॅन्ड कनेक्टिव्हिटी मिळेल असे म्हटले जात आहे.


युरोपियन अवकाश केंद्र फ्रेंच गुएना येथून मध्यरात्री 2 वाजता हे प्रक्षेपण करण्यात आले. याआधी मार्च 2018 मध्ये या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु त्यामध्ये शास्त्रज्ञांना अपयश आले. त्यानंतर गेले सात महिने शास्त्रज्ञांनी अथक प्रयत्न करुन उपग्रहामधील त्रुटी दूर केल्या. उपग्रहातील तांत्रिक गोष्टींचा बराच अभ्यास करुन अखेर GSAT 11 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.


या उपग्रहाचे वजन 5 हजार 854 किलोग्रॅम इतके आहे. यामध्ये 40 ट्रान्सपोंडर, त्यामुळे 16 गिगाबाइट/प्रति सेकंद इतका जलद इंटरनेट स्पीड मिळू शकतो. देशात इंटरनेट क्रांती घडवून आणण्यासाठी 4 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. GSAT 11 हे त्यापैकी तिसरा उपग्रह आहे.