वधू व्हॉट्सअॅपवर खूप वेळ घालवते, वरपक्षाने लग्न मोडलं!
एबीपी माझा वेब टीम | 09 Sep 2018 11:24 AM (IST)
लग्नाच्या दिवधी वधू आणि तिचे नातेवाईक नवरदेवाची वाट बघत होते. मात्र वरातीऐवजी वरपक्षाकडून फोन आला तो लग्न मोडल्याचा.
लखनौ : वधूचं रंग-रुप, अपंगत्व, अफेअर अशा कारणांमुळे लग्न मोडल्याचं आपण ऐकलं असेल. मात्र तरुणी व्हॉट्सअॅपवर चॅटिंगमध्ये बराच वेळ वाया घालवत असल्याच्या कारणावरुन वरपक्षाने लग्न मोडल्याची घटना उत्तर प्रदेशात समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील अमरोही जिल्ह्यातील नौगाव सदात गावात ही घटना घडली. लग्नाच्या दिवधी वधू आणि तिचे नातेवाईक नवरदेवाची वाट बघत होते. मात्र वरातीऐवजी वरपक्षाकडून फोन आला तो लग्न मोडल्याचा. व्हॉट्सअॅपवर वेळ घालवण्याच्या तरुणीच्या सवयीमुळे हे लग्न मोडत असल्याची सबब सांगण्यात आली. वरपक्षाने ऐनवेळी केलेली हुंड्याची मागणी धुडकावल्यामुळे लग्न मोडल्याचा दावा वधूपक्षाने केला आहे. सासरच्या मंडळींनी 65 लाख रुपयांचा हुंडा मागितल्याची तक्रार वधूपित्याने पोलिसांकडे केली आहे. 'तरुणी व्हॉट्सअॅपचा अतिरिक्त वापर करत होती. ती लग्नाच्या आदल्या दिवशीही आम्हाला सारखे व्हॉट्सअॅप करत होती. तिच्या या सवयीमुळे आम्ही वैतागलो होतो' असा आरोप वरपित्याने केल्याचं पोलिसांनी सांगितलं.