नवी दिल्लीः वाहनधारकांना कागदपत्र सोबत ठेवण्याच्या जाचातून लवकरच सुटका मिळणार आहे. केंद्र सरकारकडून उद्या एम-परिवहन ही अॅप सेवा लाँच केली जाणार आहे. अॅपच्या माध्यमातून वाहन परवाना, नोंदणी कागदपत्र (आरसी) यांची डिजिटल कॉपी जवळ ठेवता येणार आहे.
वाहतूक पोलिसांनी कागदपत्र किंवा वाहन परवान्याची मागणी केल्यास केवळ कागदपत्रांची स्कॅन कॉपी द्यावी लागणार आहे. प्रायोगिक तत्वावर ही सेवा तेलंगणा आणि दिल्ली या दोन राज्यात सुरु केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर लवकरच देशभरात ही अॅप सेवा सुरु करण्यात येणार आहे.
परिवहन मंत्रालय आणि माहिती तंत्रज्ञान विभाग हे अॅप उद्या लाँच करणार आहेत. या अॅपमध्ये वाहन परवाना, आरसी, इन्श्युरन्स, पीयूसी अशा कागदपत्रांची स्कॅन कॉपी सेव्ह करता येणार आहे. यासोबतच विविध 20-30 सेवा या अपद्वारे देण्यात येणार आहेत.