Road Accidents In India: 2021 मध्ये झालेल्या रस्ते अपघाताचा वार्षिक रिपोर्ट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. 2021 मध्ये देशभरात झालेल्या रस्ते अपघातासंदर्भात आहे. या रिपोर्ट्समधून अनेक महत्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या रिपोर्ट्सनुसार 2021 मध्ये 4,12,432 रस्ते अपघात झाला आहेत. यामध्ये एक लाख 53 हजार 972 जणांचा मृत्यू झाला आहे. तर वर्षभरात तीन लाख 84 हजार 448 जण रस्ते अपघातात जखमी झाले आहेत. 


केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, 2020 मध्ये झालेल्या रस्ते अपघाताच्या तुलनेत 2021 मध्ये रस्ते अपघाताची संख्या कमी आहे. त्याशिवाय 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये रस्ते अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचं प्रमाणही कमी आहे. 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये रस्ते अपघातामध्ये मृत्यूचं प्रमाण 14.8 टक्केंनी कमी आहे. तर रस्ते अपघाताचं प्रमाण 8.1 टक्केंनी कमी आहे. 


लॉकडाऊनमुळे संख्या झाली कमी -
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या रिपोर्ट्नुसार 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये रस्ते अपघाता मृत्यू झालेल्यांचं प्रमाणात 1.9 टक्के जास्त आहे. रिपोर्ट्सनुसार लॉकडाऊनमुळे 2020 मध्ये अपघात आणि मृताचं प्रमाण कमी होतं. 


2020 मध्ये देशात रस्ते अपघाताचं प्रमाण आणि मृताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं दिसलं. कारण मार्च 2020 ते एप्रिल 2020 यादरम्यान देशभरात लॉकडाऊन होता. त्यामुळे रस्ते अपघाताचं प्रमाण कमी झालं होतं. त्यानंतर हळू हळू देश अनलॉक झाला. सर्व प्रकारचे निर्बंध हटवण्यात आले. त्यामुळे रस्ते अपघाताचं प्रमाण वाढल्याचं समोर आलेय. 


कशाच्या आधारावर रिपोर्ट -
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेला रिपोर्ट राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील पोलिस विभागानं दिलेल्या माहिती आणि सूचनेच्या आधारावर काढण्यात आलेला आहे.  प्रत्येकवर्षी हा रिपोर्ट जाहीर करण्यात येतो. यामध्ये देशभरात अपघातामुळे किती जणांचं नुकसान झालेय, याची माहिती समोर येते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन लावला होता. त्यानंतर देशभरातील रस्ते रिकामे झाले होते. त्यामुळे अपघातांचं आणि गुन्हेगारीचं प्रमाणात बदल झाला होता. त्यानंतर अनेक राज्यांनी हळू हळू निर्बंध हटवण्यास सुरुवात केली होती. जनजीवन पूर्वरत झाल्यानंतर रस्ते अपघातंचं प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याचं समोर आले.