गव्हर्नरपदासाठी केंद्राकडून चार नावं शॉर्टलिस्ट
एबीपी माझा वेब टीम | 27 Jun 2016 07:37 AM (IST)
मुंबई : 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'चे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांच्यानंतर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. गव्हर्नरपदासाठी केंद्र सरकारने चार जणांची नावं शॉर्टलिस्ट केल्याची माहिती आहे. गव्हर्नरपदाची दुसरी टर्म स्वीकारणार नसल्याचं रघुराम राजन यांनी स्पष्ट केल्यानंतर पदाची सूत्रं सांभाळण्यासाठी नव्या अधिकाऱ्याचा शोध सुरु झाला. आरबीआयचे विद्यमान उपगव्हर्नर उर्जित पटेल, आरबीआयचे माजी उपगव्हर्नर राकेश मोहन, सुबिर गोकर्ण आणि देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांचा पदासाठी विचार होत असल्याचं म्हटलं जात आहे. गव्हर्नरपदासाठी चौघांसोबतच विजय केळकर, अशोक लाहिरी आणि अशोक चावला या तिघांच्या नावांची चर्चा होती.