मुंबई : ब्रेक्झिटच्या जनमत चाचणीनंतर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. जाणकारांच्या मते, अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक, भूराजकीय तणाव आणि चलन बाजारातील चढ-उतारामुळे वर्षअखेरीस सोन्याचे दर सर्वाधिक स्तरावर पोहोचतील. सोनं प्रतितोळा 33,500 रुपयांपर्यंत पोहोचू शकतं.

 

सोने 1700 तर चांदी 1400 रुपयांनी महाग



"ब्रेक्झिटनंतर आर्थिक बाजाराबाबत चित्र स्पष्ट नाही, जे सोन्यासाठी सकारात्मक आहे. डिसेंबर 2016 पर्यंत सोन्याचे दर वाढून 33,500 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात," असा अंदाज कॉमट्रेंड्ज रिसर्चचे संचालक ज्ञानशेखर त्यागराजन यांनी वर्तवला आहे.

 

 

ज्ञानशेखर यांनी सांगितलं की, "आंतरराष्ट्रीय बाजारात डिसेंबर अखेरीस सोन्याचे दर 1475 डॉलर प्रति औंस (अंदाजे 3 तोळे) होतील."

 

अवघ्या 1 मिनिटात गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचा फटका



ब्रिटन युरोपीयन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर शुक्रवारी सोन्याचे दर 8.2 टक्क्यांनी वाढून 1319 डॉलर झाले होते. त्यावेळी भारतात सोनं 1700 तर चांदी 1400 रुपयांनी महाग झाली होती.