नवी दिल्ली: जर तुम्हाला नवी कार खरेदी करायची असेल, तर त्याआधी तुम्हाला पार्किंगची जागा आरटीओला दाखवावी लागेल. जर पार्किंगसाठी तुमच्याकडे जागा नसेल तर कारचं रजिस्ट्रेशन होणार नाही. तसा कायदा करण्याचा विचार सुरु असल्याचं केंद्रीय नागरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे.

सध्या दिल्ली, मुंबई, पुण्यासह देशभरातील महत्वाच्या शहरांमध्ये अनेक इमारतीत पार्किंगची व्यवस्था नाही. रस्त्यावर वाहनं पार्किंग केल्यानं पादचाऱ्यांना चालता येत नाही, शिवाय ट्रॅफिक जॅमची समस्या उद्भवते ती वेगळीच. त्यावर हा जालीम उपाय शोधण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींशी याबाबत चर्चा सुरु असल्याचंही नायडू म्हणाले.

संबंधित बातमी