हा कायदा मोडणाऱ्यांना 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. मात्र पगडी परिधान करणाऱ्या शिखांना या नियमातून वगळण्यात आलं आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी हे विधेयक लोकसभेत सादर करताना राजकीय पक्षांकडून सहकार्याचं आवाहन केलं आहे. देशात रस्ते अपघातात दररोज 400 लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे हे विधेयक मंजूर झालं तर अनेकांचे जीव वाचू शकतात.
या विधेयकात ड्रिंक अँड ड्राईव्ह रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत ट्रॅफिक पोलिसांकडे दंड ठोठावण्यासोबतच नियम तोडणाऱ्यांचा परवाना 3 महिन्यांसाठी रद्द करण्याचाही अधिकार असेल.
पाहा व्हिडीओ