या दरवाढीनंतर दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलेंडरचा भाव 1.87 रुपयांनी वाढून 442.77 रुपये झाला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचे दर देशातील विविध ठिकाणी स्थानिक करांनुसार वाढले आहेत.
याशिवाय रॉकेलचे दरही वाढले आहेत. केरोसिनच्या दरात प्रति लिटर 26 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. दर महिन्याला दरात प्रति लिटर 25 पैशांनी वाढ करत रॉकेलवरील अनुदान संपवणं सरकारचं उद्देश आहे. मुंबईत आता केरोसिनसाठी प्रति लिटर 19.55 रुपये मोजावे लागणार आहेत.
मात्र 12 सिलेंडरच्या मर्यादेनंतर ग्राहक अनुदानाशिवाय एलपीजी सिलेंडर खरेदी करेल, त्याची किंमत 92 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. याआधी 1 एप्रिलला विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 14.5 रुपयांनी कपात करण्यात आली होती.
परंतु, विमान इंधन किंवा जेट इंधनच्या किंमतीत 0.4 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. नव्या दरांनुसार दिल्लीत जेट इंधनचे दर 51,696 रुपये प्रति किलोलिटर झाली आहे.