नवी दिल्ली : केंद्र सरकारने थेट परदेशी गुंतवणुकीच्या नियमांत मोठे बदल केले आहे. याअंतर्गत सरकारने संरक्षण, विमान, फूड ई-कॉमर्स या क्षेत्रात 100 टक्के एफडीआयला मंजुरी दिली आहे.
एफडीआयसाठी भारत सर्वात खुली अर्थव्यवस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय बैठकीत एफडीआयमधील बदलाला मंजुरी देण्यात आली. या नियमांतील बदलामुळे भारत हा एफडीआयच्या बाबतीत जगातील सर्वात खुली अर्थव्यवस्था बनली आहे. यामुळे सरकारला पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मितीसाठी मोठं यश मिळेल.
2015-46 मध्ये 55.46 अब्ड डॉलरची एफडीआय
- सरकारी आकडेवारीनुसार, 2015-16 मध्ये देशात थेट परदेशी गुंतवणूक वाढून 55.46 अब्ज डॉलर झाली आहे. एखाद्या आर्थिक वर्षात आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे.
- देशात 2013-14 दरम्यान एकूण 36.04 अब्ज डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक होती.
- सरकारच्या आजच्या नियमानुसार अनेक आंतरराष्ट्रीय यंत्रणांनी भारताची प्रथम क्रमांकाचं एफडीआय डेस्टिनेशनमध्ये निवड केली आहे. तसंच केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर शेअर बाजारही 200 अंकांनी वधारला आहे.