निवडणूक निकाल २०२६
(Source: ECI/ABP News)
सोन्याच्या दरात घसरण, दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांची झुंबड
एबीपी माझा वेब टीम | 11 Oct 2016 02:14 PM (IST)

मुंबई : दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक. हा मुहूर्त साधत देशभरात ग्राहकांनी सोने खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे. बाजारपेठेत ज्वेलर्सच्या दुकानात सोने खरेदीदारांची लगबग पाहायला मिळत आहे. राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये सराफांच्या दुकानांमध्ये ग्राहकांनी गर्दी केली आहे. सध्या एक तोळे सोन्याचा दर 30 हजार रुपयांच्याही खाली आला आहे. त्यामुळे खरेदीदार चांगलेच सुखावले आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गेल्या तीन महिन्यात सोन्या-चांदीचे दर घसरल्याचं जाणकार सांगतात. सोन्यासोबतच दसऱ्याच्या मुहुर्तावर घर, वाहन खरेदी करण्याकडेही नागरिकांचा ओघ दिसून येत आहे.