सोन्याच्या दरात घसरण, दहा महिन्यातला नीचांकी भाव
एबीपी माझा वेब टीम | 17 Dec 2016 08:46 AM (IST)
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून तेजीत असलेल्या सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. दिल्लीत प्रतितोळा सोन्याच्या दरात 500 रुपयांची घट होऊन सोनं 27 हजार 750 रुपयांवर आलं आहे. गेल्या 10 महिन्यातला सोन्याच्या दरांचा हा नीच्चांक आहे. तर चांदीचे दरही 1350 रुपयांनी घसरुन 39 हजार 600 रुपयांवर पोहोचले आहेत. भारतातील नोटाबंदी आणि अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हनं केलेल्या व्याजदरवाढीमुळे ही घसरण झाली आहे. सध्या लग्नसराईचा काळ असल्याने सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होते. त्यातच सोन्याचे भाव उतरल्याने महिलावर्गात आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे.