Gold Coin Found In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या मछलीशहरमध्ये शौचालयासाठी खड्डा खोदताना मजुरांना तांब्याच्या भांड्यात सोन्याची नाणी मिळाल्याची बातमी समोर आली आहे. मंगळवारी ही घटना घडली आहे. मात्र घरातील सदस्य व मजुरांनी याबाबत कोणालाच कळू दिले नाही. शनिवारी 16 जुलै रोजी पोलिसांना याची बातमी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ही नाणी ताब्यात घेतली आहेत. सर्व नाणी ब्रिटिश राजवट 1889-1912 मधील सांगितली जात आहेत. पोलीस कामगारांची चौकशी करत आहेत. यातील मजूरही फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मच्छलीशहर शहरातील कजियाना परिसरातील नूरजहाँ पत्नी इमाम अली राईन यांच्या घरात शौचालय बांधण्यासाठी मंगळवारी खड्डा खोदला जात होता. उत्खननादरम्यान तांब्याच्या भांड्यात काही नाणी सापडल्याची चर्चा आहे. यावरून कामगार आपापसात भांडू लागले. कुटुंबाच्या मते, कामगारांनी काम अर्धवट सोडले. दुसऱ्या दिवशी पुन्हा मजूर आले आणि नाण्यांच्या लोभापायी खोदकाम करू लागले. याचदरम्यान एका मजुराने राईन यांच्या मुलाला सोन्याची नाणी मिळाल्याचे सांगितले.
राईन यांच्या मुलाने काम करणाऱ्या मजुरांकडून नाणे मागायला सुरुवात केली असता मजुरांनी त्याला नाणे दिले. बुधवारी सायंकाळपर्यंत घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिसांनी कामगारांची चौकशी केली. मजुरांनी आधी अशी कोणतीही नाणी सापडली नसल्याचे सांगितले, मात्र पोलिसांनी कडक कारवाई केल्यावर त्यांनी सोन्याची नाणी मिळाल्याचे मान्य केले. मजुरांनी 9 सोन्याची नाणी पोलिसांना दिली आणि एक नाणे घरमालकाने दिले. एकूण 10 नाणी पोलिसांनी ताब्यात घेतली. तांब्याच्या भांड्यात किती नाणी होती? ते अजून स्पष्ट झालेले नाही. पोलीस कामगारांची चौकशी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या