Cheetah In India : जवळपास 70 वर्षांनंतर भारतातील जंगलात  चित्ता (Cheetah) परत येणार आहे. मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान (Kuno Palpur National Park) आफ्रिकी चित्त्यांच्या (African Cheetah) स्वागतासाठी तयार आहे. अंतरमहाद्विपीय स्थानांतरण योजने अंतर्गत त्यांना भारतात आणले जाणार आहे. जर सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्या तर चित्ता ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला भारतात आणण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

 जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या या प्राण्याला भारतीय सरकारने 1952 साली  नामशेष म्हणून घोषित केले होते. मात्र आता लवकरच चित्ता मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात दिसणार असल्याची माहिती नागरिर वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. वन विभागाचे मुख्य सचिव अशोक बरनवाल म्हणाले, चित्ता लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. चित्त्यांची पहिली जोडी ऑगस्ट महिन्यात येण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्टला त्यांचे दर्शन होण्याची देखील शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेतून येणार चित्ते भारतात

Continues below advertisement

 दक्षिण आफ्रिकेतून चित्ते भारतात आणले जाणार आहे.  चित्ते भारतात आणण्यासाठी दोन्ही देशांमध्ये करार करण्यात येणार आहे. लवकरच या कराराल अंतीम स्वरूप देण्यात येणार असून त्यावर स्वाक्षरी करण्यात येणार आहे. चित्ता सर्वाधिक दक्षिण आफ्रिकेत आढळले जातात.

12 से 15 चित्त्यांच्या राहण्याची तयारी सुरू

वन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतात येणाऱ्या चित्त्याची संख्या ही केंद्र सरकारद्वारे निश्चित करण्यात येणार आहे. सध्या 12 से 15 चित्त्यांसाठीची तयारी सुरू आहे. सुरूवातीच्या काळात स्थलांतरित जनावरांना ठेवण्यासाठी आठ स्वतंत्र जागा तयार करण्यात येणार आहे. 

सात दशकानंतर अफ्रिकेतून चित्ता भारतात 

चित्ता पृथ्वीवर सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे.   जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या या प्राण्याला भारतीय सरकारने  नामशेष म्हणून घोषित केले होते.  स्वातंत्र्यपूर्व काळातील शिकारीमुळे भारतातून चित्ता नष्ट झाला होता.  भारतातून चित्ता पूर्णपणे नामशेष झाल्याचे अधिकृतरित्या घोषित केल्यानंतर जवळजवळ सात दशकानंतर अफ्रिकेतून चित्ता भारतात आणण्यात येणार आहे.

 छत्तीसगडमधील  महाराजा रामानुज प्रताप सिंहदेव यांनी केली होती शेवटची शिकार

 छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील महाराजा रामानुज प्रताप सिंहदेव यांनी 73 वर्षापूर्वी एका वयस्कर चित्त्याची शिकार केली होती. शिकार केल्यानंतर त्यांनी हे फोटो बॉम्बे नॅचरल हिस्ट्रीला शिकारीचे फोटो पाठवले होते. 1947 साली महाराजा रामानुज प्रताप सिंहदेव यांचा चित्त्याच्या शिकारीसोबतचा फोटो हा शेवटचा फोटो समजला जातो. त्यानंतर 1952 साली भारतीय  सरकारने अधिकृतपणे चित्त्यास नामशेष म्हणून घोषित केले होते.